एलके इलेव्हन संघाचा दुसरा विजय; स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने उघडले विजयाचे खाते !!
पुणे : जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलके इलेव्हन संघाने सलग दुसरा तर, स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने पहिल्या विजयाची नोंद करत गुणांचे खाते उघडले.
सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत भूषण सवे याच्या १६० धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने आयोध्या वॉरीयर्स संघाचा ११५ धावांनी धुव्वा उडवित विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने २६७ धावांचा डोंगर उभा केला. भूषण सवे याने ६५ चेंडूत ८ चौकार आणि १८ षटकारांसह १६० धावांची खेळी केली. किरण देशमुख (३९ धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (२५ धावा) यांनी दुसर्या बाजूने भूषणला साथ दिली. या धावसंख्ये समोर आयोध्या वॉरीयर्सचा डाव १५२ धावांवर मर्यादित राहीला. शंतनु गांधी याने नाबाद ७७ धावांची खेळी केली.
हृषीकेश आगाशे याच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने आयडीआज्-अ-सास संघाचा ६६ धावांनी पराभव केला. हृषीकेश आगाशे याच्या नाबाद ८८ धावा तसेच कुणाल गुप्ता (५९ धावा), शंतनु आठवले (२७ धावा) आणि अमित गणपुले (नाबाद २० धावा) यांच्या धावांच्या जोरावर एलके इलेव्हनने २०२ धावांचे आव्हान उभे केले. याचा पाठलाग करताना आयडीआज्-अ-सास संघाचा डाव १३६ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पार्टन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद २६७ धावा (भूषण सवे १६० (६५, ८ चौकार, १८ षटकार), किरण देशमुख ३९, नचिकेत कुलकर्णी २५, यश तुंग २-२५) वि.वि. आयोध्या वॉरीयर्सः २० षटकात ९ गडी बाद १५२ धावा (शंतनु गांधी नाबाद ७७ (६३, १० चौकार, १ षटकार), विकी अवघडे २०, विशाल प्रभाकर ६-२२); सामनावीरः भूषण सवे;
एलके इलेव्हनः २० षटकात २ गडी बाद २०२ धावा (हृषीकेश आगाशे नाबाद ८८ (६१, १३ चौकार, कुणाल गुप्ता ५९ (३२, १० चौकार, १ षटकार), शंतनु आठवले २७, अमित गणपुले नाबाद २०) वि.वि. आयडीआज्-अ-सासः २० षटकात ९ गडी बाद १३६ धावा (सनी मट्टू ४५, रौनक टाँक १४, सुयश भट २-७); सामनावीरः हृषीकेश आगाशे;