फिक्की महिला आघाडीने समाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला – अमिताभ गुप्ता
पुणे : फिक्की महिला आघाडीच्या उद्योजिका व्यवसाय व उद्योग सांभाळून समाजाचे देणे म्हणून सामाजिक कार्यात झोकून काम केले. त्यांच्या सामाजिक कामाचा समाजापुढे एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले.
फिक्की महिला आघाडीचा वार्षिक सर्वसाधारण समारंभ व नीलम सेवलेकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन गुप्ता यांच्या हस्ते नुकतेच पार पडले . त्यावेळी ते बोलत होते . निलम सेवलेकर यांनी फिक्की महिला आघाडीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पाच दुर्गम गावे दत्तक घेतली. यामध्ये गावांचा विकासाबरोबर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, संगणक उपलब्ध करून दिले. विविध सामाजिक कार्ये केली आहेत. फिक्कीच्या कार्याचा गुप्ता यांनी सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले . या समारंभात फिक्की च्या महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला .या समारंभास फिक्कीच्या अध्यक्षा नीलम सेवलेकर,रेखा मगर ,सोनिया राव , पिंकी राजपाल , यासह फिक्की महिला पदाधिकारी व शहरातील उद्योजिका मोठ्या संख्येने सहभागी होत्या.