fbpx

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना आकुर्डी गुरुद्वारात अभिवादन 

पिंपरी : शहीद-ए-आजम भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना ज्या दिवशी फाशी दिली गेली तो २३ मार्च हा दिवस सर्वत्र शहीद दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आकुर्डीतील गुरुद्वारा येथे क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. तसेच शहीद दिनानिमित्त मोफत दूध गुलाब सरबत वाटप करण्यात आले. 
 यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, संतोष काळे, समीर गिरमे, बलजीत सिंह, जस्मित सिंह, कमलजीत सिंह, रवी शिंदे, जितेंद्र हसनपाल, देवेंद्रसिंह बग्गा, आकाराम चौधरी, बापू मोरे, समीर थोपटे, भगवंतसिंह संधू, तानाजी भिसे आदींनी शहीदांना अभिवादन केले.
            यावेळी आदरांजली अर्पण करताना सामाजिक कार्यकर्ते कमलजीत सिंह म्हणाले, की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे भारताचे खरे सुपुत्र होते, ज्यांनी आपल्या प्राणापेक्षा देशभक्तीला जास्त महत्त्व दिले आणि मातृभूमीसाठी बलिदान दिले. 23 मार्च म्हणजे देशासाठी लढताना हसत हसत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तीन शूर सुपुत्रांचा हुतात्मा दिवस. या तिघांना देश कधीही विसरणार नाही. 

Leave a Reply

%d bloggers like this: