श्रावणी, खुशी, स्नेहल यांना सुवर्ण
पुणे : श्रावणी कटके, खुशी तेलकर, तृप्ती चांदवडकर, स्नेहल बासकर यांनी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित वरिष्ठ, कनिष्ठ आणि कुमार गटाच्या महिलांच्या वुशू लीग स्पर्धेत सुवर्णयश मिळवले. खेलो इंडिया दस का दम अंतर्गत ही वुमन्स वुशू लीग स्पर्धा घेण्यात आली.
वडगाव बुद्रुक येथील फायटर अकादमी हॉलमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका अश्विनी पोकळे, कार्यक्रमाचे अध्यक्षा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष कोमलताई कुटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सीमा मोडक, भारती वाणी, श्रावणी कटके, प्रतीक्षा शिंदे, सोपान कटके आदी मान्यवर उपस्थित होते. तर स्पर्धेच्या समारोपास सचिन मोरे, ऋषिकेश कुठे, युवराज जाधव उपस्थित होते. सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. प्रत्येक गटात एक सुवर्ण, एक रौप्य दोन कास्य व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेत वरिष्ठ गटात अदर स्टाइल प्रकारात पुण्याच्या खुशी तेलकरने अव्वल क्रमांक पटकावला, तर पुण्याच्याच स्नेहल बासकर दुसऱ्या क्रमांकावर राहिली. पालघरची विधी कोटपने तिसरे स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रावणी कटके हिने तायजीकॉन प्रकारात सुवर्णयश मिळवले. त्याचबरोबर तिने सिंगल वेपन मध्येही सुवर्णपदक पटकावले. ननक्वॉन प्रकारात पुण्याची तृप्ती अव्वल, तर नागपूरची जया टेकाम दुसऱ्या क्रमांकावर राहिली. सिंगल व्हेपन मध्ये श्रावणीने तृप्तीला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला. डबल व्हेपनमध्ये स्नेहल बासकरने सुवर्ण, तर विधी कोटपने रौप्यपदक मिळवले.
सब-ज्युनियर गटात चनक्वॉन प्रकारात पुण्याच्या आराध्या शिंदे, समृद्धी शिंदे, सिमरन शेलार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. आराध्याने कॉनशू प्रकारातही सुवर्णयश मिळवले. दाउशू प्रकारात श्रद्धा दिवेकरने, तर जैनशू प्रकारात श्रावणी जाधव हिने बाजी मारली. गुनशू प्रकारात सिमरन शेलारने अव्वल, ऋग्वेदी इंगळेने दुसरा क्रमांक पटकावला.
निकाल – वरिष्ठ गट – ४८ किलो – सायली भंडारी (ठाणे), इशिका अंतुरकर (नागपूर), पूर्वा निकम (धुळे), निकीता जगताप (पुणे). ५२ किलो – गितांजली चव्हाण (सांगली), हर्षदा काळभोर (पुणे), प्रांजली कदम (ठाणे), अनिशा चव्हाण (पुणे). ५६ किलो – अस्मी गुरव (रायगड), शुभांगी सोनकांबळे (नांदेड), सोनाली जाधव (सांगली), नंदिनी कुंभार (पुणे). ६० किलो – अश्विनी बोत्रे (पुणे), मानवी बरगाळे (सांगली), संजना चव्हाण (रायगड), स्नेहल साळवे (यवतमाळ). ६५ किलो – सलोनी जाधव (पुणे), शौकिन कनिका (पुणे), ज्योती बुगड (उस्मानाबाद), मेधा पवार (नाशिक).
कनिष्ठ गट – ४५ किलो – स्नेहा दुधमळ (नांदेड), ऋतुजा गुरसुलीकर (पुणे), वेदिका पाटील (पुणे), वृतिका शेवाळे (ठाणे). ४८ किलो – तेजस्विनी पाटील (सांगली), रक्षिता बोरकुटे (नागपूर), समृद्धी लांडगे (पुणे), मिसांबा अन्सारी (ठाणे). ५२ किलो – फरजाणा मुलानी (सांगली), सायली गाढवे (नागपूर), सेजल तायडे (औरंगाबाद), साईश्री बच्छाव (नाशिक). ५६ किलो – ऐश्वर्या काळभोर (पुणे), दानिया काझी (पालघर), आर्या कोळी (रायगड), वंशिका रहाते (नागपूर). ६० किलो – सना सय्यद (औरंगाबाद), भूमिका साहू (नागपूर), प्रीती कांबळे (पुणे).
सब-ज्युनियर – २४ किलो – फजिलत शेख (औरंगाबाद), दर्शनी जोगीनाथ (पुणे), सोशनी बोकाटे (परभणी), त्रिशा दिगे (पुणे). २७ किलो – तैय्यना फातेमा (औरंगाबाद), ऋतू नागणे (पुणे), प्राजक्ता कांबळे (पुणे), मधुरा चिद्रावा (पुणे). ३० किलो – उमेमा फिरदोस (औरंगाबाद), अनन्या दळवी (पुणे), राजकन्या जाधव (पुणे), प्रज्ञा जाधव (पुणे). ३३ किलो – विभूती पवार (सांगली), अल्फिया पठाण (औरंगाबाद), प्रणिती दहीवडकर (धुळे), शेविता भट (पुणे). ३६ किलो – श्रुष्टी पारटे (पुणे), तनिष्का भंडारी (कोल्हापूर), तेजस्विनी साहू (पुणे), काजल जोजी(पुणे).