Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त अभिवादन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अधिष्ठाता डॉ.विजय खरे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र, आजीवन अध्ययन व अध्यापन केंद्राचे संचालक डॉ.विलास आढाव, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर, विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading