राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी सुरत-न्यायक्षेत्राचा गैरवापर व ‘अवमान कायद्या’च्या निष्कर्षांची पायमल्ली.. काँग्रेस राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – देशातील मुलभूत प्रश्नांवर व देशाची सार्व संपत्ती ताब्यात जात असलेल्या उद्योगपती अडाणींचे बाबतीत मोदी सरकारला संसदेत भेडसाऊन सोडणाऱ्या काँग्रेसनेते श्री राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी, मोदी सरकारने कट कारस्थानाने (स्वराज्यातील सुरत कोर्टाचा आधार घेत) २ वर्षांची शिक्षा सुनावत त्यांची बदनामी करण्याचा व त्याद्वारे त्यांचे ‘लोकसभा सदस्यत्व’ घालवण्याचा प्रयत्न’.. निंदनीय असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला असुन, याचा तीव्र निषेध केल्याचे सांगितले..!
संसदेत संवैधानिक मार्गाने काँग्रेसनेते राहुल जी गांघी यांना रोखू शकत नसल्यामुळेच मोदी – शहांच्या सरकारने स्व-राज्य गुजरात मध्ये हे घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!
कर्नाटकातील कोलार मतदार संघांतील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे प्रचार दरम्यान राहुल गांधी बोलत असतांना मोदी जी सत्तेवर आल्या पासुन देशातील ‘मोठे चोर’ बँकांची फसवणूक करून, बाहेर जात असल्याचे सांगीतले..
देशास आर्थिक चुना लावुन पळुन जाणारे “मल्ल्या, चोकसी, नीरव मोदी व ललीत मोदी इ.” असतील तर पळुन जाणारे अघिक मोदीच् का निघतात..(?) व मोदी सरकार या विरुध्द का कारवाई करत नाही..(?) पंप्र मोदीजी चोरांना वाचवत आहे का..(?) यातुन काय बोध घ्यावयाचा (?) असेच त्यांचे कोलार मधील एकंदर भाषणाचे सुर होते..!!
वास्तविक सदर ची केस ही कोलार (कर्नाटक)च्या न्यायक्षेत्रात आली पाहीजे होती तसेच मानहानी केस मध्ये संदर्भांन्कीत व्यक्तिचे थेट व प्रत्यक्ष नांव घेऊन त्यावर आरोप केल्या प्रकरणी ‘संबंधित व्यक्तिनेच’ (ललीत वा नीरव मोदींनीच) तक्रार वा दावा करणे गरजेचे असतांना,
‘मानहानी’ संबंधित निष्कर्षांचे उल्लंघन देखील झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे असुन, या निकाल विरोधात ‘वरीष्ठ न्यायालयात’ अपील करण्यात येणार असल्याचे सांगितले..
राहुल गांधींचे ‘सरकारच्या निती व धोरणांवर’ टिका करण्याचा संविधानाने दिलेला अधिकार अबाधित राहील व यातून कोणत्याही समाज व कम्युटीस दुखावण्याचा वा टार्गेट करण्याचा हेतु नव्हता, हे देखील स्पष्ट होईल असेही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!
त्यामुळे हा कोणाचाही व्यक्तिगत अपमान नसुन ‘व्यक्तिगत अवमान’ वा अब्रु नुकसान कायद्याचे निष्कर्ष देखील या केस साठी लागु होत नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले ..!