fbpx

लीला पुनावाला फाउंडेशन कडून आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील १९०० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती

पुणे : आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील परंतु शैक्षणिकदृष्ट्या होतकरू आणि गरजू अश्या १९०० हून अधिक मुलींना लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी (मेरिट-कम-नीड बेस्ड) शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. यात पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरातील मुलींचा समावेश आहे. यापैकी सुमारे १५०० मुली या अंडरग्रॅजुएशन इंजीनियरिंग (डिग्री) , डिप्लोमानंतर इंजीनियरींग , फार्मसी, नर्सिंग, सायन्स आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या आहेत.

एलपीएफ कडून या मुलींना शिष्यवृत्तीद्वारे त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी पाठिंबा दिला जाईल. याचसोबत यातील ४५० हुन अधिक मुली या ७ इयत्तेत शिक्षण घेणार्या आहेत त्यांनाही त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला जाईल. या वर्षीच्या शिष्यवृत्ती प्रदान समारोहाचे स्वरूप अनोखे होते, ज्यामध्ये विविध ठिकानी संपन्न झालेल्या एकुन १३ कार्यक्रमांमध्ये या मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी एलपीएफच्या अध्यक्षा लीला पुनावाला, संस्थापक व विश्वस्त फिरोज पुनावाला, एलपीएफचे बोर्ड ऑफ ट्रस्टी, एलपीएफच्या सीईओ प्रिती खरे, एलपीएफचे सीनियर कॉर्पोरेट पार्टनर, डोनर्स, शिष्यवृत्ती निवड समितीचे सदस्य आणि हितचिंतक यांच्या हस्ते मुलींना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना लीला पुनावाला म्हणाल्या की “ एलपीएफ ने आपल्या २७ व्या वर्षात पदार्पण केले असुन आत्तापर्यंच १४,२०० हुन अधिक मुलींना सक्षम बनवण्याचा टप्पा पार केला आहे. आमच्या गुणवत्ते-सह-गरज निकषावर दिल्या जाणार्या शिष्यवृत्तीचा आणि राबवल्या जाणार्या कौशल्य-विकास कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे या मुलींना संपूर्णपणे सक्षम बनवणे. मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देणे, सोबतच विविध तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणे ही त्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठीची मोठी गरज आहे, आणि हे त्यांच्या शैक्षणिक अभ्यासस देखील पूरक आहे. आमच्या फाउंडेशनच्या कित्येक मुली आज जगभरातील कॉर्पोरेट, शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय संस्थांसोबत कार्यरत असुन त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आज त्या आपल्या कुटुंबास आणि अनुषंगाने समाजास आधार देत आहेत आणि एक चांगली व्यक्ती म्हणून आपली सर्व कर्तव्य देखील पार पाडत आहेत. फाउंडेशनच्या या सर्व मुली आमच्या सतत विस्तारणाऱ्या या एलपीएफ कुटुंबाच्या आजीवन सदस्य बनल्या आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: