‘हिंदु जननायकांना’ अरबी समुद्रात न ऊभारलेल्या ‘शिव स्मारकावर’ बोलावेसे वाटले नाही काय..? … काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – गुढी पाडव्याचे दिवशी, शिवाजी पार्क वर केलेल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाकरे कुटुंबियांच्या ऊखाळ्या काढण्यातच त्यांना धन्यता वाटली असुन, महाराष्ट्राच्या भवितव्या विषयी चकार शब्द ही न ऊच्चारता महाराष्ट्रा विषयी कोणताही विकासाचा अजेंडा ‘मनसे’ कडे नसल्याचेच स्पष्ट केल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
राज ठाकरे यांनी अरबी समुद्रात होऊ घातलेले दर्ग्याचे व्हीडीओ दाखवले, मात्र हिंदु जननानयकांना, कोट्यावधींचा सरकारी खर्च करून पंतप्रधानांनी अरबी समुद्रात भुमिपुजन केलेल्या परंतू सु ७ वर्षे उलटुन अद्यापही न झालेल्या, हिंदवी स्वराज्य संस्थापकांचे ‘शिवस्मारकावर’ बोलावेसे वाटले नाही काय..(?) अशी उपरोधिक टिका देखील काँग्रेस ने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!