fbpx

BIG NEWS ! शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप मागे

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेंशन योजेनसाठी पुकारलेल्या संपाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आलाय. राज्यातील जवळपास 17 लाखांहून अधिक कर्मचारी गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत संपावर होते. जुनी पेंशन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी एका समितीमार्फत अभ्यास करण्यात येईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. 

राज्यात सर्वांना समान वेतन लागू असेल. जूनी पेंशन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. त्यामुळे आम्ही संपातून माघार घेत आहोत. उद्यापासून सर्व शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालयांतील कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर रुजू होतील, अशी माहिती काटकर यांनी दिली. 

Leave a Reply

%d bloggers like this: