fbpx

शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे – अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.

अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनावर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. एलईडी स्क्रीन असलेले दोन चित्ररथ जिल्ह्यातील सुमारे १५० गावातून फिरणार आहे. चित्रफितीच्या माध्यमातून शासकीय योजनांवर आधारित यशकथा आणि योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. वाहनावरही योजनांची माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: