Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून मोटार धडकून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले तिघेही सातारा जिल्ह्यातील आहेत.

विजय विश्वनाथ खैर (वय ७४), राहुल बाळकृष्ण कुलकर्णी (वय ४३, रा. दोघे सातारा), हेमंत राऊत (वय ३५, रा. सातारा) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी : कामानिमित्त मुंबईला गेलेले तिघे जण मुंबईहून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने साता-याकडे येत होते.

उर्से टोलनाक्याजवळ एका वाहनाला डाव्या बाजूने वेगात ओव्हरटेक करीत असताना डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभा असलेला कंटेनर त्यांना दिसला नाही. ते थेट कंटेनरला मागून धडकले. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

कंटेनरमध्ये अडकलेली मोटार बाहेर काढून जखमींना तळेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यातील दोघे एका कंपनीच्या कामासाठी मुंबईला गेल्याचे समजते. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading