संगीनी नारी संघटन निर्देशिका समाजासाठी मार्गदर्शक ठरेल- बिरेन शहा
पुणे : संपूर्ण भारतात संगिनी संघटनच्या 197 शाखा आहेत.या शाखामध्ये सर्व सदस्यांची माहिती असलेली परिपूर्ण अशी पहिली निदर्शिका बनविण्याचा मान पुणे संगीनी नारी संघटनला मिळालेली आहे. ही अतिशय गर्वाची बाब आहे. महिलाचे जेव्हा संघटन होते तेव्हा काय होऊ शकते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे संगीनी नारी संघटन आहे,असे मत जेएसजीआयएफ इंटरनॅशनलचे डायरेक्ट बिरेश शहा यांनी व्यक्त केले.
महिला दिन व रंगपंचमीचे औचित्य साधून जेएसजीआयएफ संगीनी नारी संघटन पुणे यांनी पहिल्या सभासद डिरेक्टरी (निदर्शिकाचे ) प्रकाशन करण्यात आले.जेएसजीआयएफ संगीनी नारी संघटनचे पुण्यात तब्बल 1060 सदस्य आहेत.या डिरेक्टरीमध्ये या सर्व सदस्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.व्यवसाय , संपर्क क्रमांक यामुळे महिला एक उत्तम मार्गदर्शिका मिळणार आहे.अण्णाभाऊ साठे सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी 650 हून अधिक संगीनी उपस्थित होत्या. सांगिनीची परिपूर्ण माहिती असलेली निर्देशिका बनविणे हा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. हा पूर्ण होताना मला अतिशय आनंद होत आहे. प्रत्येक संगिनीला या निर्देशिकेचा अतिशय उपयोग होणार आहे, असे मत संगीनी नारी संघटन पुणेच्या अध्यक्षा निरंजना चुत्तर यांनी यांनी व्यक्त केले.
1060 महिलांची परिपूर्ण माहिती असलेली निर्देशिका बनविणे हा एक प्रकारे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.अध्यक्षा निरंजना चुत्तर यांनी अतिशय उत्तम रितीने हा शिवधनुष्य पेलेला आहे.ग्रुपमधील सदस्यांनी देखील अतिशय उत्तम साथ दिल्यामुळे हे शक्य झाले असे मत संस्थापक अध्यक्ष अनिता शाहा यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मंचावर जेएसजीआयएफ इंटरनॅशनलचे डायरेक्ट बिरेश शहा , पीआरओ राजेंद्र धोका,आयडी मनीष शहा,लालचंद जैन,महाराष्ट्र रिजनचे व्हाईस प्रेसिडेंट दिलीप मेहता, व्हाईस प्रेसिडेंट हसमुख जैन,सेक्रेटरी अमोल जव्हेरी,पुणे झोनचे समन्वयक युवराज शहा,प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा लखीचंद खिवंसरा,स्वाती विजय मालू आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीनी नारी संघटन पुणेच्या अध्यक्षा निरंजना चुत्तर, संस्थापक अध्यक्ष अनिता शाहा,नीलिम दोशी, मंजूषा धोका, विद्या जैन, वैशाली शाह कविता शाह, मंगल टाटिया, योगिता लुंकड़, क्रिना मेहता, यशोदा राठौड़, सेजल शाह, पल्लवी देसाई, रेखा कांगतानी आदी कमिटी सदस्य व सर्व ग्रुप सदस्य यांनी कार्यक्रम उत्तम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.