fbpx

सिटी बँक ठरली एशिया पॅसिफिकमधील ‘बँक ऑफ द इअर’

हाँगकाँग: आयएफआर आशिया (IFR Asia) या भांडवली बाजारावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आघाडीच्या उद्योग पत्रिकेच्या संपादकांच्या एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार सिटीला अलीकडेच इंटरनॅशनल फायनॅन्सिंग रिव्ह्यू (IFR) आशिया पुरस्कार २०२२ मध्ये एशिया पॅसिफिकमधील ‘बँक ऑफ द इअर’  म्हणून ओळखले गेले.

आयएफआर आशिया (IFR Asia) नुसार नवीन भौगोलिक राजकीय घडामोडी आणि वाढत्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर वर्षभर आशियाई जारीकर्त्यांना जी ३ (G३) बाजारात आणण्याच्या क्षमतेसाठी सिटीला अशिया पॅसिफिकमधील ‘सर्वोत्तम बॉन्ड हाऊस’ म्हणूनही नाव देण्यात आले.

आयएफआर आशिया (IFR Asia) कडून स्वतंत्रपणे मिळालेली ही मान्यता सीटीची भांडवली बाजाराबाबतची तज्ज्ञता व उपायात्मक दृष्टिकोन आणि सतत बदलत असलेल्या आव्हानात्मक मॅक्रोवातावरणात आपल्या ग्राहकांसाठी जटिल व्यवहार विकसित करून ते अमलात आणण्याचे त्यांच्या सल्लागार टीमचे कौशल्य यांची पुष्टी करते.

आयएफआर आशिया (IFR Asia) ने पुरस्कार विजेतेपदासह संपादकीय लेखनात मांडले की, “संपूर्ण आशिया मध्ये असलेल्या त्यांच्या सतीतवामुळे आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण क्षेत्रातील समावेशामुळे सीटी एक स्थिरतेचा किल्ला बनले आहे.  तसेच तिच्या व्यावसायिक बँकेने बाजारात वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये जारीकर्त्यांना अधिक पर्याय देण्यास सक्षम केले आहे.”

“हा विजय म्हणजे सीटीच्या फ्रँचायझीची ताकद, आमच्या जागतिक नेटवर्कचा स्पर्धात्मक फायदा आणि आमच्या टीमची उत्स्फूर्तता आणि ऊर्जा  गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला निवडल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे सीटीमधील आशिया पॅसिफिक बँकिंग, भांडवली बाजर सल्लागाराचे प्रमुख श्री. जॅन मेट्झ्गेर म्हणाले.

गेल्या वर्षभरात सीटीने जागतिक भांडवली बाजारातून आशियाई ग्राहकांसाठी २०० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त उभारण्यात मदत केली. सीटी नेतृत्वाखालील व्यवहारांनी खालील गोष्टींसह पुरस्कार देखील जिंकले:

  • रिलायन्स इंडस्ट्रीज ४ अब्ज अमेरिकन डॉलर मल्टी-ट्रान्च बॉन्ड – सर्वोत्तम गुंतवणूक ग्रेड बॉन्ड
  • लेनेवो ६७५ मिलियन अमेरिकन डॉलर सात वर्षांचे सीबी – सर्वोत्तम संरचित इक्विटी इश्यू
  • LG एनर्जी सोल्यूशनचा W१२.८ ट्रिलियन आयपीओ- साऊथ कोरिया भांडवली बाजार डील
  • थाई लाइफ इन्शुरेंस Bt ३७ बिलियन आयपीओ- थायलंड भांडवली बाजार डील

पुरस्कारांच्यासह आलेल्या लेखनात संपादकीयमध्ये म्हटले आहे, “सीटीसमूहाने साल २०२२ मध्ये त्यांच्या अनेक समवयस्कांच्या अगदी उलट केवळ आपल्या  भूमिकेवर उभे राहण्यापेक्षा बरेच काही जास्त केले. बँक सक्रिय होती कारण तिने सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी मार्केट विंडो शोधल्या आणि सर्वोत्तम संभाव्य निधी संधी शोधत असताना ग्राहकांना पाठिंबा दिला.”

“आशियातील जारीकर्त्यांना २०२२ मध्ये अस्थिर भांडवली बाजाराचा सामना करावा लागला होता जे अगदी एका क्षणाच्या सुचनेवर बंद होण्याकडे झुकलेले होते; पण सीटी समूहाने त्यांच्या निधी योजना व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक स्थिरता ग्राहकांना प्रदान केली.”

“२०२२ मध्ये जारीकर्ते केवळ आशियातील मागणीवर अवलंबून राहू शकत नव्हते, पण सीटीने त्यांना आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांशी जोडले आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: