fbpx

रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची उद्या शिर्डी येथे बैठक

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  (आठवले) पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची महत्वपूर्ण बैठक उद्या दि. 12 मार्च 2023 रोजी सकाळी ११.३० वा. शांतीकमल हॉटेल, शिर्डी राहता रोड, एसटी स्टँड जवळ, शिर्डी जिल्हा अहमदनगर  येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. 

रिपाइं ( आठवले) राज्य कमिटी च्या उद्या महत्वपूर्ण बैठकीस राज्यातील रिपाइं चे केंद्रीय कार्यकारीणीचे पदाधिकारी; राज्यकार्यकारीणी चे सदस्य ; पदाधिकारी; सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस; विभागीय अध्यक्ष यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे;  राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: