fbpx

अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

मुंबई: बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज (9 मार्च) पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांच्या आकस्मित निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 

सतीश कौशिक हे बुधवारी गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते, तिथून परतत असताना त्यांना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

%d bloggers like this: