fbpx

सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर  THE BEGINNING’  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यामध्ये सस्पेन्स थ्रिलर प्रकारात कमी चित्रपट असल्याचे दिसते त्यातही महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलरपट अपवादानेच दिसतात. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने एका हटके विषयावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शातिर THE BEGINNING’ (Shatir THE BEGINNING)असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाची कथा- सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. तर पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले असून त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. रेश्मा वायकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘शातिर THE BEGINNING’  या चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेवर आधारित असून चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले असून गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे. ‘शातिर  THE BEGINNING’  या चित्रपटात मराठीत आणि बॉलीवूड मधील दिग्गज कलाकारांसह  काही नवोदित कलाकार सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. परंतु त्यांची नावे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: