fbpx

चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट टायगर्स, पीवायसी जायंट्स, बीपीसीएल एनरजायजर्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत कॉर्नर पॉकेट टायगर्स, पीवायसी जायंट्स, बीपीसीएल एनरजायजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (PYC-ATC Snooker Championship)
 
पीवायसी हिंदु जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत कॉर्नर पॉकेट टायगर्स संघाने एसीइ वॉरियर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट टायगर्सच्या केतन चावलाने एसीइ वॉरियर्सचा चेतन राजरवालचा 59-09, 60-34, 60(47)-00 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवुन दिली. दुसऱ्या सामन्यात कॉर्नर पॉकेट टायगर्सच्या मोहम्मद हुसैन खानला एसीइ वॉरियर्सच्या रोहन कोठारीने 16-44, 57-14, 43-00, 37-72, 28-28 असे पराभुत करुन संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट टायगर्सच्या पियुष कुशवाने सोनू मातंगचा 07-39, 77-07, 28-35, 65-37, 45-31 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. 
 
अन्य लढतीत विजय निचानी, अभिजीत रानडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्स संघाने पीवायसी स्टार्स संघाचा 2-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. बीपीसीएल एनरजायजर्स संघाने डेक्कन स्ट्रायकर्सचा 2-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून मनन चंद्रा, एस श्रीकृष्णा यांनी सुरेख कामगिरी केली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी जायंट्स वि.वि.पीवायसी स्टार्स 2-0 (विजय निचानी वि.वि. योगेश लोहिया 19-45, 88-08, 37-20, 85-47; अभिजीत रानडे वि.वि. सलील देशपांडे 45-00, 92-32, 38-15);
 
बीपीसीएल एनरजायजर्स वि.वि.डेक्कन स्ट्रायकर्स 2-0 (मनन चंद्रा वि.वि.प्रशांत पवार 41-00, 66-53, 43-05; एस श्रीकृष्णा वि.वि.समर खंडेलवाल 53-08, 96-00, 41-06);
 
कॉर्नर पॉकेट टायगर्स वि.वि.एसीइ वॉरियर्स 2-1(केतन चावला वि.वि.चेतन राजरवाल 59-09, 60-34, 60(47)-00; मोहम्मद हुसैन खान पराभुत वि.रोहन कोठारी 16-44, 57-14, 43-00, 37-72, 28-28; पियुष कुशवा वि.वि.सोनू मातंग 07-39, 77-07, 28-35, 65-37, 45-31);

Leave a Reply

%d bloggers like this: