fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

काँग्रेस नेते राहुल गांधींचा नवीन लूक व्हायरल

केंब्रिज : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ट्रेडिंगवर आहेत. लंडनला पोहोचताच राहुल गांधींमध्ये मोठा बदल झाला आहे. त्यांचा नवा लूक सध्या चर्चेत आला आहे.
राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौ-यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. दरम्यान त्यांनी स्वत:मध्ये बदल केला आहे.

केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल ६ महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले. राहुल गांधींच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. यात्रेत पांढ-या दाढीसह कडाक्याच्या थंडीतील त्यांचा व्हाईट टी-शर्ट लूक चर्चेत राहिला होता. अशातच सध्या राहुल गांधींचा जंटलमन लूक व्हायरल होताना दिसत आहे.

राहुल गांधींचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी दाढी ट्रीम केल्याचे पाहायला मिळत आहे. केंब्रिज जज स्कूलने आपल्या ट्वीटर हँडलवर राहुल यांच्या भेटीचा आणि त्यांच्या भाषणाचा विषय शेअर केला आहे. राहुल बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत भारत जोडो यात्रेचे अनुभव शेअर करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading