बजाज फिनसर्व्हचा पुण्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम
पुणे -भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेली बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनी विविध दिव्यांग व्यक्तींना हायटेक मोबिलिटी सोल्युशन्स प्रदान करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम करण्यास पुढाकार घेणार आहेत.
‘अक्सेसेबिलिटी अँड फ्रिडम ‘हा उपक्रम बजाज फिनसर्व्ह च्या सामाजिक जबाबदारी कार्यक्रमाचा एक भाग आहे.ज्याचा उद्देश मुलांसाठी आणि तरुणांसाठी न्याय आणि सर्वसमावेशक संधी उपलब्ध करून देणे हा आहे . वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम कारणाऱ्या राउंड टेबल इंडियाच्या भागीदारीत बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी त्यांच्या उपकंपनी द्वारे हा निधी उभारून या उपक्रमास चालना देत आहेत.
नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमात हा उपक्रम सुरु करण्यात आला जेथे राउंड टेबल इंडिया द्वारे ओळखल्या गेलेल्या ४० भिन्न अपंग व्यक्तींना हायटेक मोबिलिटी उपकरणे प्रदान करण्यात आली. जी व्हीलचेअरला रस्त्याच्या योग्य वाहनात रूपांतरित करतात . हे उपकरण आयआयटी मद्रास च्या आर २डी २ मधील स्टार्ट अप न्यूओमोशनची एक स्वदेशी नवकल्पना आहे .
या उपक्रमांतर्गत बजाज फिनसर्व्ह कडून भारतभरातील प्राप्तकर्त्यांना २०० हायटेक मोबिलिटी सोल्युशन्स प्रदान केले जातील. या कर्यक्रमाला बजाज फिनसर्व्ह सीएसआर सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज ,तसेच बजाज फिनसर्व्ह चे सीएसआर समूह प्रमुख अजय साठे ,बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स चे एमडी तपन सिंघेल आणि राउंड टेबल इंडिया तसेच निओ मोशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .
या प्रसंगी बजाज फिनसर्व्ह सीएसआर सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज म्हणाल्या ,”हा उपक्रम दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा आहे. लहान मुलं आणि तरुणांना संसाधने ,आरोग्य यामध्ये समान प्रवेश देऊन त्यांचा शिक्षण आणि संधी क्षेत्रात समावेश वाढविण्याचा आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे एमडी आणि सीईओ तपन सिंघेल म्हणाले, “समूह म्हणून, बजाज फिनसर्व्हने नेहमीच समाजाला परत देण्यावर आणि समुदायांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यावर विश्वास ठेवला आहे. व्हीलचेअर वापरणाऱ्या अनेक भारतीयांना त्यांच्या नित्य जीवनात असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांच्या करिअरच्या संधींवर मर्यादा येतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही २०० हाय-टेक मोबिलिटी दान केली आहेत. आम्ही समाजात बदल घडवून आणण्याचा आणि या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
