Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

New Show : झी मराठी घेऊन येत आहे एक रहस्यमय भयकथा चंद्रविलास

ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ ( Chandravilas) या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक झी मराठी (Zee Marathi) वर मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.

चंद्रविलासमधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शर्वरी या बाप-लेकीमधल्या प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे. दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का, अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल का, हे या उत्कंठावर्धक मालिकेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होईल, ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे. वैभव मांगलेचा हा नवीन लुक प्रेक्षकांना नक्कीच भावेल यात शंकाच नाही. मालिकेचं लेखन केलंय समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी.

तेव्हा पाहायला विसरू नका एक रहस्यमय भयकथा “चंद्रविलास” २७ मार्चपासून रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading