Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्र इंटकच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची नियुक्ती..

मुंबई – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक),महाराष्ट्र राज्याच्या रिक्त असलेल्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी. संजीवा रेड्डी यांनी केली आहे.

राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे दुःखद निधन  झाले आहे. स्व. जयप्रकाश छाजेड यांच्या निधनामुळे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार दि. ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मामा फाळके सभागृह, राष्ट्रीय मिल मजदुर संघ (इंटक), ग.द. आंबेकर मार्ग, परळ, मुंबई येथे घेण्यात आली. महाराष्ट्र इंटकचे कामकाज गतिमान करण्यासाठी रिक्त असलेल्या महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारिणीची निवडणूक तात्काळ होणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र इंटकच्या कामकाजात गती आणून कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे व पुढील कामकाज करणे यासाठी नविन कार्यकारिणीची निवडणूक होवून नविन कार्यकारीणी होईपर्यंत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे वरिष्ठ राष्ट्रीय सचिव डॉ. कैलास कदम यांना महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला होता त्यास आज राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी. संजीवा रेड्डी यांनी नियुक्ती देऊन शिक्कामोर्तब केले.

डॉ. कैलास कदम यांना प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्तीपत्र देतेवेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. एस. के. यादव, महिला अध्यक्ष माजी खासदार सौ. अल्का क्षत्रिय, राष्ट्रीय वरिष्ठ सचिव श्री आर. डी. चंद्रशेखर, वरिष्ठ सचिव श्री. सत्यजित रेड्डी, राष्ट्रीय सचिव श्री. मुकेश तिगोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम यांच्या नियुक्तीचे उस्फुर्तपणे स्वागत महाराष्ट्रातील इंटक संलग्न असलेल्या सर्व संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading