Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

BSNL कर्माचाऱ्यांचे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

पुणे : बी.एस.एन.एल. (BSNL)  शासकीय बिल्डिंग ऑफिस सातारा रोड या ठिकाणी बी.एस.एन.एल.युनियन,ऑल इंडिया बी.एस.एन.एल. D.O.T. पेन्शनर असोसिएशन व कॅज्युयल कॉन्ट्रॅक्ट लेबर फेडरेशन यांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली या निदर्शनामध्ये १५०-२०० कर्मचारी सहभागी झाले होते.सध्या देशांमध्ये कामगार वर्ग व शेतकरी वर्ग यांच्यावर खूप अन्याय होत आहे. बीएस.एन.एल.कर्मचाऱ्यांना त्यांचा तिसरा पे रिविजन आणि पेन्शन रीवीजन मागील पाच वर्षांपासून रखडून ठेवलेला आहे. 4-G  अद्याप बी.एस.एन.एल. ला दिला गेला नाही.कुठलीही आर्थिक मदत केंद्र सरकार करत नाही.. फक्त घोषणाबाजी करत आहे.त्यामुळे हजारो ग्राहक बी.एस.एन.एन. सोडून जातात.आणि बी.एस.एन.एल.तोट्यामधे येत आहे.मजदूर लोकांना त्यांच्या कामांचा मोबदला वेळेवर मिळत नाही .  ८/८ महीने त्यांचा पगार ठेकेदाराकडे थकीत आहे त्यामुळे कर्मचारी वर्ग केंद्र सरकारवर नाराज आहेत.देशभरातील   कर्मचारी, मजदूर,, शेतकरी वर्ग एकत्र येऊन दिल्ली मध्ये  ५ एप्रिल २०२३ रोजी एक भव्य मजदूर किसान रॅली काढणार आहेत.या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी संपूर्ण भारतातील  बी.एस.एन.एल.कर्मचारी यांनी हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे ठरविले आहे. पुणे आणि महाराष्ट्रातून  ५०० हून अधिक कर्मचारी मोर्चामध्ये सामील होणार आहेत.त्यासाठी गेट मिटिंग आणि निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  आणि हा कार्यक्रम १०० टक्के सफल झाला. यावेळी परिमंडळ सचिव युसुफ जकाती,बबन सूर्यवंशी, विकास कदम, गणेश भोज, नरेंद्र माने रोहिणी कुलकर्णी आदींनी सभेला मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर वाबळे यांनी सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading