Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

National Badminton Tournament -दहाव्या मानांकित हर्षिलचा संघर्षपूर्ण विजय

पुणे – महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित हर्षिल दाणी, आर्य भिवपाठकी यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या मोहिमेस थाटात सुरुवात केली. आर्यचा विजय एकतर्फी राहिला. हर्षिलला मात्र विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले.

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने योनेक्स सनराईज ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा (National Badminton Tournament )म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे. स्पर्धेत शुक्रवारी वैयक्तिक लढतींना सुरुवात झाली. स्पर्धेत अस्मिता चलिहाने महिला एकेरीतून पहिल्या फेरीत सहज विजय मिळविला. पुरुष एकेरीत अनुभवी बी. साईप्रणितनेही आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली.

दहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीला पहिला अडथळा पार करण्यासाठी ५८ मिनिटे झुंजावे लागले. किरणकुमारने त्याला जबरदस्त प्रतिकार केला. किरणने पहिलाच गेम २१-१६ असा जिंकून सनसनाटी सुरुवात केली. पण, त्यानंतर हर्षिलने आपल्या फटक्यांवर आणि वेगावर नियंत्रण ठेवत खेळ केला. दुसऱ्या गेमलाही किरणने सुरुवातीपासून आघाडी गेत गेमच्या मध्याला ११-७ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर हर्षिलने सलग तीन गुण घेत पिछाडी ११-१० अशी भरुन काढली. १३-१३ अशा बरोबरीनंतर हर्षिलने सलग पाच गुण घेत १८-१३ अशी आघाडी मिळवली आणि त्यानंतर मागे वळून बघितले नाही. तिसऱ्या गेमला मात्र हर्षिलच्या आक्रमकतेला किरण उत्तर देऊ शकला नाही. निर्णायक गेमला हर्षिलने ८-४ अशी आघाडी मिळविली. मात्र, किरणने कडवा प्रतिकार करत ९-९ अशी बरोबरी साधली. या बरोबरीनंतर मात्र हर्षिलने सलग ७ गुण घेत १६-८ अशी मोठी आघाडी घेतली आणि ती टिकवून ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या अन्य एका लढती महाराष्ट्राच्या आर्य भिवपाठकीने रिकू खापेचा २४-२२, २१-११ असा पराभव केला.

महिला एकेरीत अस्मिता चलिहाने आपली लय कायम राखत गौरीकृष्णाचे आव्हान २१-९, २१-१२ असे सहज मोडून काढले. या गटातील एका चुरशीच्या लढतीत प्रेरणा आलवेकरने पिंकी कर्कीचा प्रतिकार २१-६, २०-२२, २१-१४ असा मोडून काढला.

निकाल –
महिला एकेरी – (पहिली फेरी)
इश्रानी बरुआ वि.वि. करिष्णा खर्डीकर २१-११, २१-९, सूर्या करिष्मा तामिरी वि.वि. याजुम ला २१-८, २१-११, सी. सुजाता वि.वि. अनिषा राय २१-१०, २१-१५, स्मित तोष्णिवाल वि.वि. आदर्षिनी श्री एन. बी. २३-२१, १३-२१, २१-१०, आदिती भट वि. वि. जान्हवी महाले २१-११, २१-१०, अस्मिता चलिहा वि.वि. गौरीकृष्णा टी आर. २१-९, २१-१२, विजेता हरिष वि.वलि. आत्मजयिता राय बर्मन २१-९, २१-९, प्रशंसा बोनम वि.वि. नमिता पठानिया १९-२१, २२-२०, १४-२१, उन्नती बिश्त वि.वि. स्वागतिका राऊत २१-४, ३१-६, तानी चंद्रा वि. वि. रशिका दास २१-८, २१-१०, शेखोटोलू पुरो वि.वि. तेजस्विनी ठाकूर २१-१३, २१-१०, तनिशा सिंग वि.वि. प्रभावती एस, २१-६, २१-२, लिखिता श्रीवास्तव वि.वि. याशिका २१-१६, २१-१२, धरित्री यातीश वि.वि. रुचा सावंत २१-१३, १७-२१, २१-९, नेहा पंडित वि.वि. सुनंदिता बिस्ता २१-५, २१-६, रितुपर्ण दास वि.वि. लार्लेम्पुई २१-०, २१-७, प्रेरणा आलवेकर वि.वि. पिंकी कर्की २१-६, २०-२२, २१-१४.

पुरुष – किरण जॉर्ज वि.वि. संकर मुथुस्वामी एस २१-१२, २१-१३, झुचोपेमो ओडुयो वि.वि. बळवंत २१-१४, २१-१२, प्रथमेश कुलकर्णी वि.वि. केविन वोंग वि.वि. भास्कर चक्रवर्ती २१-२, २१-१, अभिषेक येलिगर वि.वि. अंकित मोंडल १४-२१, २१-१४, २१-१२, डी सरथ वि.वि. लाहरुएटलुआंगा जोसेफ २१-१०, २१-१४, श्रेयस जैस्वाल वि.वि. विद्यासागर सालम २१-१७, २१-१७, वकुल शर्मा वि.वि. आयन रशिद २२-२०, २१-१०, शंतनु शर्मा वि.वि. के. गोविंद १६-२१, २१-१६, २१-१०, शुभम गुसेन वि. वि. रितुराज नाग २१-१४, २१-१८, पियांशु राजावत वि.वि. करण चौधरी २२-२०, २१-१५, यशवर्धन वि.वलि. बिशालक्षा पोद्देर २१-८, २१-१७, वैभव जाधव वि.वि. ध्रुव बन्सल २१-७, २१-१९, आर्यभिवपाठकी वि.वि. रिकु खापे २४-२२, २१-११, हर्षिल दाणी वि.वि. किरण कुमार १६-२१, २१-१७, २१-१२, साईप्रणित बी वि.वि. पृथ्वी रॉय २१-१३, २१-१९

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading