Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

डॉ. के. पी. लेखवाणी हे भाषा व्यवहाराचे सेतू ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी यांचे प्रतिपादन

पुणे – साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त सिंधी साहित्यिक डॉ. के. पी. लेखवाणी (Dr. K. P. Lekhvani) हे सिंधी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा अभ्यासक असून त्यांनी केलेले संशोधनात्मक काम हे भाषा व्यवहाराच्या सेतू सारखे आहे, असे प्रतिपादन साहित्यिक व शिक्षण तज्ञ डॉ. न. म. जोशी (Dr.N.M.Joshi)यांनी केले. 

सदाशिव पेठेतील राणी लक्ष्मी मंडळाच्यावतीने साहित्य अकादमी पारितोषिक प्राप्त सिंधी साहित्यिक डाॅ. के.पी. लेखवाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सिंधी साहित्यिक डाॅ. के.पी. लेखवाणी यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे, सिंधी साहित्यिक भगवान हरानी, सइदा इनामदार, कैसरा सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. 

सन्मानाला उत्तर देत डाॅ. के.पी. लेखवानी म्हणाले, भाषा व्यवहार हा मनुष्य जीवनाच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा व्यवहार आहे. याची अनेक उदाहरणे देखील त्यांनी यावेळी दिली. श्रीराम रानडे, सिंधी साहित्यिक भगवान हरानी यांनी देखील डाॅ. के.पी. लेखवाणी यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading