Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

न्यायाधीन वयोवृद्ध बंद्यांना आता स्वखर्चाने जाड अंथरूण आणण्याची अनुमती

पुणे  : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत कारागृह विभागातील अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्याच्या उपाययोजनांबाबत कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व कारागृहांचे अधीक्षक यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये ५० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांच्या वयाचा विचार करून जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणतः जाड अंथरूण तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्याबाबत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यानुसार या बाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व सर्व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रक निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कारागृह विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस.बी.दराडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading