दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को ऑप क्रेडिट सोसायटी लि च्या अध्यक्षपदी उमाकांत वालगुडे तर सचिवपदी गणेश भोज
पुणे : पुणे पोस्टस अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिमाखदार विजय मिळवून संघर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व २१ संचालक निवडून आल्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी निवडीची सभा दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मा.मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री. हौसारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सदाशिव पेठ येथील सभागृहामध्ये पार पडली. यामध्ये श्री. उमाकांत रामचंद्र वालगुडे यांची अध्यक्षपदी, श्री. राजेंद्र तानाजी तुपे यांची उपाध्यक्षपदी तर श्री. गणेश रत्नाकर भोज यांची सन्मान्य सचिवपदी बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी संस्थेचे मावळते अध्यक्ष श्री दिपक धुमाळ, उपाध्यक्ष श्री भानुदास कोलते, तज्ञ संचालक श्री नागेशकुमार नलावडे व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.दिलीप जगदाळे, श्री.अरविंद शिवतरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
