Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

कसबा पेठ मतदार संघात आतापर्यंत १० हजार वाहनांची तपासणी

पुणे  -कसबा पेठ विधानसभा मतदार संघात प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक व नाका तपासणी पथकामार्फत आतापर्यंत १० हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनामार्फत मतदार संघात ९ तपासणी नाके तसेच ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच भरारी पथकामार्फत संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

पोलिस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य मिळत आहे. आतापर्यंत भरारी पथकामार्फत व नाका तपासणीमध्ये १० लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर रुपये १२ हजार २५० किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किस देवकाते यांनी दिली आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading