Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

ससून रुग्णालयातर्फे रक्तदान अभियानाचे आयोजन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मोहिमेअंतर्गत बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने शहरातील तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात ३७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील ससून रुग्णालय, टिळक रोड येथील सचिन ढवळे अकॅडमी आणि निकमार विद्यापीठ बाणेर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान मोहिमेचे उद्घाटन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी केले. यावेळी उपअधिष्ठाता मुरलीधर तांबे, डॉ.अजय तावरे, डॉ.भारत दासवानी, डॉ.निला नकाते, डॉ.सोमनाथ खेडकर, डॉ.मानसिंग साबळे, डॉ.संजय तांबे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading