Thursday, September 24, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना संपवण्याचा हा पूर्वनियोजित कट – उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडून चोरलं गेलं. बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेला संपवण्याचा हा पूर्वनियोजित कट होता. आमच्याच माणसाला सुपारी देवून शिवसेनेची हत्या करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. 

आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, केंद्रीय निवडणूक आयोग व शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेचा जन्म भाजपचे तळवे चाटण्यासाठी झालेला नाही. काल निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाचे नाव व चिन्ह मिंधे गटाला दिले. बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेला संपवण्याचा हा पूर्वनियोजित कट होता. आमच्याच माणसाला सुपारी देवून शिवसेनेची हत्या करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. पण खरी शिवसेना कोणाची हे दसरा मेळाव्याच्या दिवशीच जनतेने दाखवून दिले आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, आज आमच्या पक्षाची जी अवस्था झाली आहे ती पुढे कोणत्याही पक्षाची होवू शकते. यांना वेळीच रोखल नाही तर, 2024 मध्ये देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरु होईल. लोकशाहीचा अस्त होवून हुकूमशाहीची सुरूवात होईल.    

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading