“सेवा सहयोग फाऊंडेशन” च्या किशोरी विकास प्रकल्पाची दशकपूर्ती -कार्यशाळा संपन्न
पुणे : वयाच्या १२ ते १८ वर्षापर्यंत शारीरिक, भावनिक बदलांना सुयोग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी किशोरींच्या सोबत मैत्रिणीच्या नात्याने उभे राहण्याच्या गरजेतून सेवा सहयोगच्या किशोरी विकास प्रकल्पाला दहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी कर्वेनगर येथील महर्षी कर्वे संस्थेच्या रमा पुरुषोत्तम संकुलाच्या आवारामध्ये सकाळी १० ते ५ दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात किशोरी प्रकल्पाच्या प्रमुख राधिका कोंडेजकर यांच्या मनोगताने झाली.
उदघाटन प्रमुख पाहुण्या रंगभूमीच्या सुप्रसिद्ध सिनेकलाकार विभावरी देशपांडे, महर्षी कर्वे संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी आणि सुप्रिया भोसले- हवाई दलाच्या निवृत्त अधिकारी आणि dasalt systems च्या सद्य CSR प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर किशोरी विकास प्रकल्पाच्या १० वर्षाच्या प्रवासावर असाधारित चित्रपट दाखविण्यात आला, आणि प्रेम, मैत्री व आकर्षण या सामाजिक समस्या वर उत्तम पथनाट्य किशोरी विकास प्रकल्प मुंबई विभागाच्या किशोरींनी सादर केले.
त्यानंतर विविध समांतर सत्रे आयोजित करण्यात अली.
“CSR आणि लाभार्थीं परस्परसंवाद” या सत्रात CSR कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कशोरी विकास प्रकल्पातील मुलींची चर्चा झाली. या सत्रात २५ कंपन्यांचे ५० प्रतिनिधी आणि विकास प्रकल्पतील ६० किशोरींनी आणि सेवा सहयोग च्या ३० समन्वयक स्वयंसेवकांनी भाग घेतला. यात मुलींना प्रत्यक्षपणे कंपन्यांच्या CSR प्रतिनिधींनीबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली तसेच CSR प्रतिनीधींनाही मुलींच्या अडचणी त्यांची स्वप्ने जाणून घेण्याची संधी मिळाली.
“NGO कट्टा” या सत्रात सेवा सहायोग संस्थेच्या प्रमुख प्रकल्पांच्या कार्यप्रणालीविषयी माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले (presentation). त्यानंतर सेवा सहयोग आणि इतर सामाजिक संस्थामध्ये याविषयावर चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाली.
किशोरींसाठी प्रेरणादायी सत्र आयोजित करण्यात आले ज्या सत्रात भारतीय हवाई दलाच्या निवृत्त अधिकारी आणि dasalt systems च्या CSR प्रकल्प निर्देशक (प्रोग्रॅम leader) सुप्रिया भोसले यांनी स्वतःचा प्रवास तसेच भारतीय सैन्य दलात तसेच हवाई दलात कारकीर्द करण्यासाठी चे मार्गदर्शन केले.
किशोरीच्या ग्रुप ऍक्टिव्हिटी आयोजित करण्यात आल्या.
“चला बुद्धिबळ खेळू या ” या ऍक्टिव्हिटी मध्ये १०० मुली,८० कॉर्पोरेट स्वयंसेवक आणि ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. आधी बुद्धिबळ खेळाचे फायदे – तणाव घालविण्यासाठी, समस्या सोडविणे आणि बौद्धिक विकास,स्मरणशक्ती वाढ यासाठी आपण करू शकतो हे सांगितले. २ स्वयंसेवकांनी तो खेळ खेळून दाखविला आणि शेवटच्या १५ मिनिटात या मुली स्वतःहून प्यादी हलवायला लागली. शेवटी अभिप्राय देताना आम्ही हा खेळ पहिल्यादाच पाहिला पण आम्हाला हा खूप आवडला असून आम्ही तो नंतरहि खेळात राहू असे सांगितले
“पौष्टिक खा आणि निरोगी रहा” या ऍक्टिव्हिटी ची रचना सिम्बायोसिस कॉलेज च्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी केली होती . यात त्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेत याविषयावर पॉवरपॉईंट सादरीकरण केले. यात खाण्यापिण्यातील चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या, कोणत्या पदार्थातून कोणती पोषक तत्वे मिळतात,काय खावे आणि काय खाऊ नये. आणि शेवटी एक पांढरी रिकामी प्लेट आणि अनेक विविध खाद्य पदार्थांची चित्रे फळांपासून ते पिझा बर्गर,भाज्या ई. होती. रटाळ चर्चा सत्राऐवजी तळ्यात मळ्यात खेळातून या पौष्टिक पदार्थ खाण्याचे महत्व ही पटवून सांगितले.
थेट संगीताचा कार्यक्रम(Live music session)- लाईव्ह म्युझिक सेशन यात कॉलेजच्या २ विद्यार्थी स्वयंसेवकांनी गिटार वादन सादर केले. त्याच्या सुमधुर गिटार वादनाने मुलींना उस्फुर्तपणे नाचायला भाग पडले आणि नंतर गिटार वादनाचे रूपांतरण डांन्स ऍक्टिव्हिटी झाले.
किशोरीच्या विकासाची गरज महाराष्ट्रात इतरही ठिकाणी आहे आणि त्याची सुरुवात इतर सामाजिक संस्थांबरोबर मिळून एकमेकांचे सामर्थ्य वापरून ते कसे पुढे नेता येईल यासाठी काही इतर सामाजिक संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या याविषयावरील कामाचे सादरीकरणही या सत्रात करण्यात आले. आणि त्यांच्या सादरीकरणावर आधारित काही संस्थांची निवड हि करण्यात आली.
अखेरच्या सत्रात किशोरी विकास प्रकल्पाचे कामाचे सादरीकरण कार्यक्रमाच्या प्रमुख शिल्पा राजहंस आणि टीम
यांनी केले. त्यानंतर मनीषाताई जोशी -संचालक, प्रकल्पाच्या प्रमुख यांनी कार्यक्रम आढावा घेत हे काम पुढे कसे नेता येईल यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी समारोपाच्या प्रमुख वक्त्या ज्ञान प्रबोधीनी च्या कार्यकारी समिती सदस्य सुवर्ण गोखले यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. त्यात त्यांनी किशोरी विकास मधे मातांचा उपयोग कसा करून घ्यावा, मातांच्या मार्फत किशोरींना कसे आपलेसे कसे करावे हे सांगितले किशोरी विकास प्रकल्पाचे
हे काम मुलीतील विश्वास निर्माण करणारा ,आत्मविश्वास वाढवणार,आईशी असलेला संवाद वाढवणारा आहे.
हे काम पुढे नेण्यासाठी आणखी काय करता येईल हे उदाहरण देऊन सांगितले. सामूहिक पसायदानाने ह्या चैतन्यपूर्ण सोहळ्याची सांगता झाली
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात प्रकल्पाच्या समन्वयक निकिता जाधव, रुचिता पवार आणि क्षितिजा शिर्के यांनी महत्वाची भूमिका पार पडली .
