Sunday, October 25, 2026
Latest NewsPUNE

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक

पुणे : जय भवानी जय शिवाजी चा जयघोष… ढोल ताशा ंचा गजर… लाठी काठींचे मर्दानी खेळ… विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये फडकणारे भगवे झेंडे अशा उत्साहपूर्ण वातावरणात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल १५०० विद्यार्थी पांरपारिक वेशात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे समुहगान केले.

शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, रवींद्र धंगेकर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियमक मंडळ अधयक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार, कमलताई व्यवहारे, बाळासाहेब गायकवाड, माधव पवार आणि सर्व सन्माननीय मान्यवर, शाखाप्रमुख उपस्थित होते.

शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्रीमंत कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.

श्री शिवाजी मराठा सोसायटी – बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला.

जिजाऊ आणि बाल शिवरायाची मूर्ती असलेला फुलांनी सजलेला रथ मिरवणूकीत सहभागी झाला होता. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि न्यू गंधर्व बँडने वादन केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत संदेश विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत दिला.

अण्णा थोरात म्हणाले, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी साहसी खेळ सादर केले. शिवरायांचे नेतृत्वगुण, त्यांचे शौर्य स्वराज्यासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांनी ते अंगिकारावे यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading