महाराष्ट्राची मदार मालविका बनसोडवर
पुणे : मालविका बनसोड, तारा शहा, हर्षील दाणी यांच्याकडून आगामी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या अपेक्षा असतील. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राची खेळाडूंची नावे महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत वाड यांनी जाहीर केली.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. केंद्रीय क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी २४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री प्रकाश पदुकोण देखील उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळाला आहे. डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांचे या स्पर्धेला प्रमुख प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेत साडेचारशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
पुरुष एकेरी : हर्षील दाणी, वरुण कपूर, आर्य भिवपाठकी, शुभंकर डे, दर्शन पुजारी, प्रथमेश कुलकर्णी, रिषभ देशपांडे.
महिला एकेरी : मालविका बनसोड, तारा शहा, साद धर्माधिकारी, मधुमिता नारायण, श्रुती मुंदडा, पूर्वा बर्वे, प्रेरणा अलवेकर, स्मित तोष्णीवाल, नेहा पंडित.
पुरुष दुहेरी : अक्षण शेट्टी-दीप रांभिया, विपूल कुवळे – विराज कुवळे, प्रतीक रानडे – शुभम पाटील, आदित्य म्हात्रे-निहार केळकर.
महिला दुहेरी : सिमरन सिंघी – रितिका ठाकर, अनघा करंदीकर – योगिता साळवे, निकिता जोसेफ – सोनाली मिर्खेळकर.
मिश्र दुहेरी : दीप रांभिया – रम्या वेंकटेश, वरद गजभिये- आरती चौगुले, अभ्युद्य चौधरी – अनघा करंदीकर.
महाराष्ट्र मिश्र सांघिक आंतरराज्य-आंतरविभागीय स्पर्धेसाठीचा संघ
कर्णधार – दीप रांभिया
पुरुष – शुभंकर डे, वरुण कपूर, दीप रामभिया, अक्षण शेट्टी, प्रतीक रानडे.
महिला – मालविका बनसोड, पूर्वा बर्वे, रितिका ठाकर, अनघा करंदीकर, योगिता साळवे.
राखीव खेळाडू – आर्य भिवपाठकी, तारा शहा
