Monday, June 15, 2026
Latest NewsSports

राष्ट्रीय रोबोकॉप स्पर्धेत रेस्क्यू मेझ गटात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक


एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला राष्ट्रीय रोबोकॉप ज्युनियर स्पर्धेचा मान
पिंपरी : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला या वर्षीच्या राष्ट्रीय रोबोकॉप ज्युनिअर स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मिळाला होता. फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातून ६० संघांमधून २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी संघांना जुलै २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉप ज्युनिअर स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
रेस्क्यू मेझ गट :- प्रथम क्रमांक : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, पुणे (रावेत), द्वितीय क्रमांक : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, पुणे (रावेत); तृतीय क्रमांक पारितोषिक : ग्रीनवुड हाय इंटरनॅशनल स्कूल, सर्जापूर;
या स्पर्धेतील ऑन स्टेज प्रकारात देखील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलने सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला.
एलएससीएल बेंगळुरूचे संचालक डेव्हिड प्रकाश, जपान एससीसीआयपीचे सीइओ किकुची सॅन, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले व जुलै मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे परीक्षण अभियांत्रिकी, संशोधन, स्टेम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ञ प्राध्यापकांनी केले.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
रेस्क्यू लाइन गट :- प्रथम : रोबोलेक्ट्रो टीम स्टुडिओ, द्वितीय : शिव नाडर स्कूल, नोएडा, तृतीय : शिव नादर स्कूल, गुडगाव;
ऑन स्टेज गट :- प्रथम : ग्रीनवुड हाय इंटरनॅशनल स्कूल, सर्जापूर, द्वितीय : बीजीएस वर्ल्ड स्कूल, चिकबल्लापुर, तृतीय : बीजीएस वर्ल्ड स्कूल, नागरूर;
सॉकर गट :- प्रथम : शिव नादर स्कूल, फरीदाबाद,
द्वितीय : शिव नादर स्कूल, फरीदाबाद, तृतीय : शिव नादर स्कूल, गुडगाव;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading