अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाहबंधनात
अभिनेत्री स्वरा भास्कर लग्न बंधनात अडकली आहे. लग्नासंदर्भात तिने ट्विट करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्वराने राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहिती आहे.
दोघांचे जवळचे मित्र त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये स्वरा लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसून येत आहे. रिपोर्ट्सनुसार, कोर्टात स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत स्वराने ६जानेवारीला लग्न केल्याची माहिती आहे.
स्वराने पोस्टमध्ये लिहिले आहे की, कधी कधी काही गोष्टी नेहमी आसपास असतात आणि तुम्ही त्यांना खूप दूर शोधत राहतात. आम्ही प्रेमाच्या शोधात होतो, पहिले मैत्री मिळाली. मग आम्ही एकमेकांना मिळालो. फहाद झिरार अहमद माझे हृदयात तुझे स्वागत आहे. हे गोंधळलेले आहे परंतु ते तुझे आहे. स्वराने व्हिडिओमध्ये तिने फहादसोबत घालवलेले काही खास क्षण शेअर केले आहेत.
फहाद अहमद हे समाजवादी पक्ष युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. २०२० मध्ये एका आंदोलनादरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यांचा दोघांचा पहिला सेल्फेही आंदोलनादरम्यान घेण्यात आला होता. तर ३४ वर्षीय स्वरा भास्करने २०१० मध्ये गुजारिश चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०११ मध्ये आलेल्या तनु वेड्स मनू या चित्रपटाने त्यांना जबरदस्त ओळख दिली. ते मिरांडा हाऊस, दिल्ली येथून पदवीधर आहेत तर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. स्वरा भास्कर शेवटची ‘जहां चार यार’ या चित्रपटात दिसली होती.
