बीएनवाय मेलनचे विद्यार्थ्यांचा डिजिटल शिक्षण अनुभव सुधारण्यासाठी दि पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाईंडसोबत नवीन अॅप सादर
बीएनवाय मेलन ने आज दि पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाईंड या संस्थेच्या टेकनॉलॉजिकल क्षमता वाढवून विद्यार्थ्यांचा डिजिटल शिक्षण अनुभव सुधारण्याच्या दिशेने या संस्थेसोबत आपल्या १० वर्षांच्या संबंधांचा पुढचा टप्पा गाठताना व्हिजन कम्पॅनियन अँड ‘स्टुडंट कम्पॅनियन’ हे अॅप सादर करण्याची घोषणा केली.
बीएनवाय मेलनच्या ‘विमेन इन टेक्नॉलॉजी’ या एंटरप्राइज रिसोर्स ग्रुप ने जानेवारी २०२३ मध्ये एका अंतर्गत हॅकॅथॉनच्या अंतर्गत या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप तसेच कार्यक्रमादरम्यान अत्याधुनिक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एमआयएस) यांची संकल्पना आणि विकास १२८ महिला अभियंत्यांनी केले आहे. व्यवस्थापन, देखभाल आणि विश्लेषण यांत मदत करण्यासाठी या एमआयएसची रचना करण्यात आली आहे. यात मशिन लर्निंगची भविष्यात भर घालण्यात येणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती, आरोग्य, निवासाचे रेकॉर्ड यांचे पूना ब्लाईंड स्कूल जुनी माहिती, रिग्रेशन आणि क्लस्टरिंग मॉडेलच्या आधारे विश्लेषण करू शकेल.
या उद्घाटनप्रसंगी बीएनवाय मेलन इंडियाच्या फिलॉन्थ्रोपी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख डॉ. विद्या दुराई म्हणाल्या, आपल्या स्थानिक समुजदायांना आधार देणे हे बीएनवाय मेलनच्या मूल्यांमध्ये खोलवर रूजलेले आहे. दि पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाईंडसोबतच्या आमच्या संबंधांचा लक्षणीय परिणाम केवळ शाळेच्या विद्यार्थ्यांवरच होईल असे नाही तर देशभरात पसरलेल्या १५०० पेक्षा जास्त विशेष क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि त्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध होईल.
या अॅपमधील व्हिजन कम्पॅनियन घटकामुळे दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना आवाजाने सक्रिय होणाऱ्या क्वेरिजच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळणार आहे. गुंतागुंतीच्या इंटरफेसमधून न जाता त्यांना सुलभतेने ऑडियोबुक्स आणि अन्य शैक्षणिक संसाधने मिळतील. या अॅपमधील स्टुडंट कम्पॅनियन हा घटक श्रवणबाधित व्यक्तींसाठी डिझाईन केलेला असून त्यात दृश्यात्मक रीतीने आकर्षक आशय दिलेला असून यात दस्तावेज, पुस्तके आणि चित्रे यांचा समावेश आहे. त्यांची निर्मिती बीएनवाय मेलनच्या स्वयंसेवकांनी केली आहे.