Wednesday, May 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

शैलजा स्विकारणार का वीणा आणि प्रभासचं नातं?

‘हृदयी प्रीत जागते’ ही एक तरुण संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेचा नायक रॉक बँड परफॉर्मर आहे, तर नायिका कीर्तन गायिका आहे ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे.

कॉन्सर्टच्या शेवटी प्रभास वीणाला प्रोपोस करतो, पण ती त्याला उत्तर देऊ शकली नाही. वीणा घरी आल्यावर बघते तर, बाबा प्रचंड भडकले आहेत, या सर्व प्रकारामुळे बाबा वीणा चं गाणं बंद करतात. प्रभास वीणाला भेटायला तिच्या घरी येतो. तेंव्हा बाबा त्याला निघून जायला सांगतात. प्रभासच्या लक्षात आलंय की  वीणाचं ही त्याच्यावर प्रेम आहे. पण बाबांमुळे ती व्यक्त होत नाहीये. बाबा आणि प्रभास ह्यांच्यात मोठा वाद होतो. प्रभास गावात थांबण्याचा निर्णय घेतो. देवाला साकडं घालतो. प्रभासला होणाऱ्या त्रासाने वीणा खूप तळमळते. ही गोष्ट शैलजाला कळते. ती प्रभासला न्यायला  संगमनेरला येते. तेंव्हा तिला समजतं की मनोहर चं लग्न झालंय आणि वीणा ही त्याचीच भाची आहे. शैलजा प्रभास ला घेऊन तडकाफडकी निघते. प्रभासची वीणासाठीची  तळमळ बघून शैलजा त्यांचं नातं स्वीकारेल कि नाकारेल? हे पाहणे मनोरंजक असणार आहे. त्यासाठी पाहायला विसरू ‘हृदयी प्रीत जागते’ सोमवार ते शनिवार संध्या ८:०० वा.  फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading