ऑईल इंडिया लिमिटेड संघाला विजेतेपद !!
अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा !!
उत्तरार्धात ऑईल इंडिया संघाने आणि एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. ऑईल इंडिया संघाने मिळवलेली १-० अशी आघाडी कायम ठेवली आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
पियुष भंडारी आणि मोनटोस माझी यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने एअर इंडिया संघाचा २-० असा पराभव करून तिसर्या क्रमांकाचे पद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एफसीआय पश्चिम विभागीय कार्यकारी संचालक आर.पी. सिंग आणि एफसीआय महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक मनमोहन सिंग सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ईएसआयसी पुणेचे उपसंचालक एच.के. पांड्ये, एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना, एफसीआय एआयपीएस कन्ट्रोल बोर्डचे मुख्य रमेश सचदेवा, अखिल भारतीय १९ वर्षाखालील महिला फुटबॉल प्रशिक्षक मोहम्मद कादीर शेख, फुटबॉलपटू एम.जी. पाटील, राष्ट्रीय हॉकीपटू हमीद उल्लाह खान आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकालः अंतिम सामनाः
ऑईल इंडियाः १ (सिरनदीप मोरन ४८ मि.) वि.वि. एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः ०;
तिसर्या क्रमांकासाठी सामनाः
फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः २ (पियुष भंडारी १८ मि., मोनटोस माझी २७ मि.) वि.वि. एअर इंडियाः ०;
