Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टर पुष्पवृष्टाची तपपूर्ती

पुणे : शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर शिवजयंतीला हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी होणार आहे. सलग १२ व्या वर्षी शिवजयंती, १९ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये ईशान अमित गायकवाड हे पुष्पवृष्टी करणार आहेत.

ईशान गायकवाड यांनी सर्वप्रथम वयाच्या ८ व्या वर्षी शिवजयंती १९ फेब्रुवारी २०१२ रोजी स्मारकावर व त्याच स्मारकाचा भाग असलेल्या विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पावर हेलीकॅाप्टर मधून पुष्पवृष्टी केली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर वडिल शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित सुरेशराव गायकवाड व आई रिंकल अमित गायकवाड या दोघांनीही पुष्पवृष्टी केली होती. शिवजयंतीला शिवरायांना या प्रकारे मानवंदना देणारे गायकवाड हे विश्वातील पहिले कुटुंब ठरले आहे.

त्यानंतर सलग ११ वर्षे ही प्रथा परंपरा अखंडीत चालू आहे. कोरोनाच्या वैश्विक टाळेबंदीच्या काळात सुध्दा २०२१ व २०२२ ला या परंपरे मध्ये खंड पडला नाही. सॅन २०१९ ला ईशानने वयाची अमृत महोत्सवी साजरा करणारे दिवंगत आजोबा सुरेश कृष्णाजी गायकवाड यांच्या बरोबर पुष्पवृष्टी केली आणि आजोबांना एक अनोखी भेट दिली होती.

ईशान गायकवाड म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकावर शिवरायांचे संस्कार हे लहानपणीच झाले असतात. माझे हे परमभाग्य आहे की शिवरायांच्या विश्वातील पहिल्या स्मारकावर मी सलग ११ वर्षे पुष्पवृष्टी करतो आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि पुणे पोलीस यांचे विशेष आभारही त्यांनी यावेळी मानले.

पुष्पवृष्टीचे संकल्पक अमित गायकवाड म्हणाले, आपण पुणेकर भाग्यवान आहोत. करवीर संस्थानाचे राजर्षि शाहू छत्रपती आणि त्यांचे पुत्र राजाराम छत्रपती यांनी शिवरायांचे हे स्मारक पुणे येथे निर्माण केले. शिवरायांचा एकसंध ओतीव काम केलेला हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य पुतळा आहे. १६ जून १९२८ साली ह्या स्मारकाचे अनावरण झाले होत.पुतळ्याचे वजन तब्बल ८००० किलो आहे. शिवरायांच्या चित्तथरारक इतिहासा सारखाचा ह्या स्मारक निर्मितीचा इतिहास चित्तथरारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading