Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

हाडांच्या आजारांकडे दुर्लक्ष नको – डॉ. वर्षा कुलकर्णी

पिंपरी :  संधिवात, आमवात, कोविड अशा आजारांमुळे हाडांची वेगाने झीज होते हाडांच्या या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. सांधेदुखीचा त्रास जाणवताच डॉक्टरांशी संपर्क साधावा उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने नियमितपणे फिजिओथेरपी करावी आणि आपले आरोग्य उत्तम ठेवावे असे आवाहन निगडी येथील स्व. श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशन च्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राधिकरण निगडी येथील कीर्ती विद्यालय येथे आयोजित केलेल्या मोफत फिजिओथेरपी आणि वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिरात उद्घाटन प्रसंगी डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी फाउंडेशनचे विश्वस्त निहाल पानसरे, संचालक डॉ. झोया पानसरे, डॉ. श्याम अहिरराव, डॉ. श्वेता पाचपुते, डॉ. गार्गी भालेकर, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चांदबी मॅडम, दलीचंद सिंघवी, दिगंबर इंगवले, राजू शिंगोटे, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिबिरात सहभागी झालेले नागरिक उपस्थित होते.
संचालक डॉ. झोया पानसरे यांच्या हस्ते मोफत फिजिओथेरपी आणि वैद्यकीय तपासणी शिबिराचे व उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. श्वेता पाचपुते, डॉ. गार्गी भालेकर यांनी रुग्ण तपासणी केली. यामध्ये मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, खांद्याचे दुखणे, सांध्यांच्या आखडणे, अर्धांगवायू, कंपवात, कोरोना झाल्यानंतर हाडांचे आजार, रिहाबिलिटेशन, कार्डिओ सर्जरी, अस्थमा, निमोनिया, एरोबिक्स, फिटनेस, लठ्ठपणा कमी करण्याचे व्यायाम, स्त्रीरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या व गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. राजू शिंगोटे यांनी ज्येष्ठ नेते व माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती दिली.
स्वागत डॉ. श्याम अहिरराव, सूत्रसंचालन राजू शिंगोटे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading