Thursday, May 28, 2026
BusinessLatest News

सोनालिकाने जानेवारी २०२३मध्ये ९,७४१ ट्रॅक्टरची केली विक्रमी विक्री  

पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर ने नवीन विक्रमी कामगिरीसह आर्थिक वर्ष २०२३ मधील आपल्या सुंदर प्रवासाला आणखी गती दिली असून २६ टक्के  देशांतर्गत विक्रीची नोंद करत जानेवारी २०२३ मध्ये एकूण ९,७४१ ट्रॅक्टरची विक्री केली आहे. कंपनीने अलीकडेच उचललेल्या अधिकृत संकेतस्थळावर ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करण्याच्या आणि परिवर्तनशील ग्राहककेंद्रीत दृष्टिकोनामुळे मुख्यतः घडलेल्या या कामगिरीने सोनालिकासाठी २०२३ या वर्षीची भव्य सुरूवात झाली आहे आणि पुढील वर्षभरासाठी कंपनीची दिशा निश्चित झाली आहे. या चकित करणाऱ्या कामगिरीमुळे कंपनीने उद्योगाच्या वाढीलाही मागे टाकले असून ती १,२८,१९० वायटीडी ट्रॅक्टर विक्रीसाठी (एप्रिल २२ – जानेवारी २३) तिने केलेल्या अथक प्रयत्नांतून प्रतिबिंबित होते.
इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले,की नाविन्यपूर्ण उत्पादने लाँच करण्याबरोबरच आम्ही वेबसाइटवर ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करण्यासारखे अनोखे उपक्रम ही राबवत आहोत. त्यामुळे शेतकरी समुदायामध्ये एक प्रकारची क्रांती घडून आली आहे कारण आम्हाला आमच्या वेबसाइटवर तसेच डीलरशिपवरही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.या दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची एक मोठी समस्या सुटली असून आमच्या आधीच मजबूत असलेल्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओसोबतच ट्रॅक्टर खरेदी प्रक्रियेत अशा पारदर्शकतेची हमी देऊन आम्ही आमच्या ब्रँडवर शेतकऱ्यांचा विश्वास आणखी मजबूत करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading