Thursday, September 24, 2026
Latest NewsSports

पहिल्या केसीए-पीवायसी 10 व 14 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरला, वेदांत काळे विजेते 

पुणे:  कुंटे बुद्धिबळ अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सुजनील केमो इंडस्ट्रीज प्रायोजित व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या केसीए-पीवायसी 10 व 14 वर्षाखालील बुद्धिबळ 2023 स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर प्रथमे शेरला, वेदांत काळे या खेळाडूंनी आपापला गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर 14 वर्षांवरील गटात प्रथमेश शेरलाने एआयएम अलौकिक सिन्हाचा पराभव करून 6 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. प्रथमेश ऑनलाईन 21के शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे. याच गटात आर्यन सिंगला आणि निशांत जवळकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. 

10 वर्षाखालील मुलांच्या गटात वेदांत काळे याने अद्विक अगरवालचा 6 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत हा मिलेनियम शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकत आहे. अद्विक अगरवालने दुसरा तर, श्रीयांश पाटीलने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पीवायसी हिंदु जिमखानाच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव शिरीष साठे आणि कुंटे बुद्धिबळ अकादमीच्या संचालिका मृणालिनी औरंगाबादकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: सहावी फेरी: 14 वर्षाखालील मुले: 
प्रथमेश शेरला(6गुण)वि.वि.एआयएम अलौकिक सिन्हा(4.5गुण);
अरिव कामत (4 गुण)पराभुत वि.आर्यन सिंगला(5 गुण);  
निशांत जवळकर (5 गुण)वि.वि.सिद्धांत साळुंके(4 गुण); 
निहिरा कौल(4.5 गुण)बरोबरी वि.मानस तावरी(4.5 गुण); 
दक्ष मार्कन(3.5 गुण)पराभुत वि. आर्यन करमळकर(5गुण);
पूर्व चौहान(3.5 गुण)पराभुत वि.सई विजयसिंह पाटील(4.5 गुण);
श्रेयस पाटील(3 गुण)पराभुत वि.आदर्श मिश्रा(4गुण);
चतुर्थी परदेशी(3 गुण)पराभुत वि.गर्व देवनानी(4गुण); 
व्रज भुजबळ(4गुण)वि.वि.वेदांत साप्ते(3 गुण);

10 वर्षांखालील मुले: 
वेदांत काळे (6गुण)वि.वि.अद्विक अगरवाल(5 गुण);
मितांश देशमुख(4गुण)पराभुत वि. इशान अर्जुन पीवाय (5 गुण);
निवान अग्रवाल(4गुण)पराभुत वि.श्रीयांश पाटील(5गुण);
सर्वज्ञ बालगुडे(4.5 गुण)बरोबरी वि.रुतम मोहगावकर(4.5गुण); 
निहांत गायकर(4गुण)बरोबरी वि.अनिरुद्ध उदगीर (4.5गुण); 
क्षितिज प्रसाद(4गुण)वि.वि.आर्यन पाटील(3गुण);
आहान दलाल(3गुण)पराभूत वि.श्रीमत पोलुरी(4गुण);
तेज पाटील (3गुण)पराभुत वि.शिवम दातीर (4गुण).
इतर पारितोषिके: 
10वर्षांखालील मुली सर्वोत्कृष्ट खेळाडू: शर्वी करपे
8 वर्षांखालील(मुले)सर्वोत्कृष्ट खेळाडू: श्रीमत पोलुरी
8 वर्षांखालील(मुली)सर्वोत्कृष्ट खेळाडू: शालवी चास्कर;
14 वर्षांखालील मुली सर्वोत्कृष्ट खेळाडू: सई पाटील;
12 वर्षांखालील(मुले)सर्वोत्कृष्ट खेळाडू: अलौकिक सिन्हा;
12 वर्षाखालील(मुली)सर्वोत्कृष्ट खेळाडू: चतुर्थी परदेशी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading