Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी

पुणे : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची माफी मागितली असून ती म्हणाली दादा खूप मोठे आहेत दादांना मी काहीच बोलू शकत नाही. माझ्याकडून अनेकदा चुका झाल्या असून मी माफी मागितली होती. अनेक लोक माझे जुने व्हिडिओ टाकत असून माझी प्रसिद्धी काहींना पाहवत नाही असे गौतमी पाटील म्हणाली.

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थित मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित केला होता. आपल्याच पक्षातील नेत्यांकडून गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याची तक्रार यामध्ये घाडगे यांनी केली होती. या तक्रारीनंतर अजित पवार यांनी या कलाकारांच्या अश्लील कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अधिवेशनात आपण आशा अश्लील कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा ठराव मांडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. राज्यभरात पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading