केंद्र सरकार उद्योजकांच्या पाठीशी – नारायण राणे
पुणे : भारताचा उद्योग क्षेत्रात ५ वा क्रमांक लागतो. २०३० मध्ये भारताचा जे.डी.पी आणि उद्योगात जगात डंका असेल. आजकालच्या पिढीने नोकरी पेक्षा उद्योगांना प्राधान्य द्यावे. शहरी असो या ग्रामीण युवकांनी उद्योजाकडे लक्ष केंद्रित करावे. केंद्र सरकार उद्योजकांच्या पाठीशी आहे, असे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज सांगितले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, मुक्तछंद, घे भरारी आणि देअसरा फाउंडेशन यांच्या वतीने उद्योजकांसाठी मोफत परिसंवादाचे आयोजन पंडित फार्म्स, कर्वेनगर, पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. सदरील परिसंवादाचे उदघाटन केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी आमदार व राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, सचिन भदाने, प्रज्ञा गोडबोले, वैशाली अपराजित, नम्रता कामतकर, राहुल कुलकर्णी, नीलम एदलाबादकर
आदी मान्यवर उपस्थित होते.
राणे पुढे बोलताना म्हणाले की, मी आठवीत असताना नाईट स्कुल करून व्यवसाय करू लागलो होतो. सध्या हॉटेल या व्यवसायात चांगली वृद्धी आहे. बारा बलुतेदार यांना सध्या आम्ही त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. अमेरिका, चीन नंतर भारत असावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे उद्योजकांचा हब व्हायला हवा. महाराष्ट्राचा देशामध्ये जोडीपीमध्ये ३४ टक्के वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की विनामूल्य आयोजित केलेल्या शिबिराला ७०० पेक्षा जास्त उद्योजकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही उद्योजकांना मोफत उद्यम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे अनेक प्रकारची योजना राबविण्यात येत आहेत. तरी जास्तीतजास्त उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योजक बनावे.
मानसिकता व्यवसायवृध्दीसाठी या विषयावर वक्त्या नयना चोपडे संचालक सलून अँपल यांनी उद्योजकांसोबत संवाद साधला तर कर्ज सहाय्यासाठी पूर्वतयारी विषयावर वक्त्या डॉ. ज्योती गोगटे यांनी मार्गदर्शन केले. देअसरा एक्स्पर्ट, बिझनेस मॅनेजमेंट आणि अॅडमिनिस्ट्रेशनवर मार्गदर्शन केले आणि उद्योजकांसाठी बँकेच्या योजना या विषयावर वक्त्या अनुजा संत यांनी सविस्तरपणे माहिती दिली. व्यवसायासाठी सोशल मिडीयाचा वापर या विषयावर वक्ते साहिल खरे यांनी मार्गदर्शन केले.
