Sunday, October 11, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

मल्याळम सिनेमाची ‘ही’ पहिली अभिनेत्री; दलित असल्याने जाळले होते घर आज गुगूलने साजरी केली जयंती

मुंबई : अनेक सामाजिक बंधने तोडून मल्याळम चित्रपटात स्त्री पात्र साकारणारी अन् त्यानंतर सामाजिक रोषाला सामोरी गेलेली मल्याळम सिनेमाची पहिली नायिका म्हणजे पी.के. रोझी. दलित असल्याने त्यांना त्यांच्या हयातीत केलेल्या कामासाठी कधीही मान्यता मिळाली नाही. उलट त्यांना राहते घर सोडून पळ काढावा लागलाहोता. मात्र आज त्यांची 120 वी जयंती Google ने पी.के. रोझी यांच्या गुगल डूडलसह साजरी केली आहे. पी.के. रोझी यांच्या १९२८ मध्ये आलेल्या ‘विगतकुमारन’ (द लॉस्ट चाइल्ड) या चित्रपटातील भूमिकेने अनेक सामाजिक चौकटी तोडल्या. 

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे 10 फेब्रुवारी 1903 रोजी रोझीचा (राजम्मा) जन्म  झाला. रोझीला अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. त्याकाळात महिला कला क्षेत्रात विशेषतः सिनेमात काम करत नसत. मात्र सामाजिक बंधने झुगारून रोझीने १९२८ मध्ये आलेला मल्याळम चित्रपट विगाथाकुमारन (द लॉस्ट चाइल्ड) मध्ये सरोजिनी या नायर महिलेची भूमिका साकारली. हा मुक  चित्रपट असला तरी पहिला मल्याळम फीचर चित्रपट होता. एका उच्चवर्णीय महिलेची भूमिका दलित महिलेने साकारल्याने समाजातील अनेकांना राग आला.

गूगलच्या अहवालानुसार, विगथाकुमारन या मूक चित्रपटात काम केल्यामुळे रोझीला प्रदेश सोडण्यास भाग पाडले गेले. तिचे राहते घर उच्चवर्णीयांनी जाळले आणि ती पळून गेली. नंतर तिने लॉरी चालक केशवन पिल्लईशी लग्न केले आणि तिचे उर्वरित आयुष्य तामिळनाडूमध्ये ‘राजम्मल’ म्हणून घालवले. मल्याळम सिनेमातील रोझीचे योगदान दिग्दर्शक कमल यांनी त्यांच्या मल्याळम चित्रपट ‘सेल्युलॉइड’द्वारे जगासमोर आणले. या चित्रपटात रोझीची भूमिका ही चांदनी गीताने साकारली होती. 2019 मध्ये, वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC), तीच्या सन्मानार्थ तिच्या नावाने एक फिल्म सोसायटी सुरू केली.

फोटो : गुगल डूडल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading