Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

नेहरु युवा केंद्रामार्फत मतदार जनजागृती

पुणे : आज नेहरू युवा केंद्र पुणे यांच्यावतीने व्यापक मतदान जनजागृती अभियानास शेठ ताराचंद रुग्णालय परिसरातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी वरप्रभ शिरगावकर यांनी चार्ली चॅप्लिनच्या वेषामध्ये मतदार जनजागृती केली.

निवडणूक विभागामार्फत कसबा पेठ तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी कलापथके, सांस्कृतिक कार्यक्रम करणारे समूह, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांचा सहभाग घेण्यात येत आहे. सार्वजनिक इमारती, रुग्णालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांच्या परिसरात तसेच विविध सोसायट्यांमधून छोट्या- छोट्या कार्यक्रमाद्वारे, पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.

नेहरु युवा केंद्राच्यावतीने आज ताराचंद रुग्णालयात मतदार जनजागृती करण्यात आली. रुग्णालयाच्या परिसरातील डॉक्टर, रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष मदानाचा संदशे देणाऱ्या ‘चार्ली’ले वेधून घेतले. नागरिकांनी त्यांच्या कलेलाही दाद दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading