Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

ई वेस्ट गोळा करा आणि मिळवा रोख बक्षिस

पुणे:  पर्यावरणाच्या रक्षणाविषयी तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने पुणे व्यापारी महासंघ व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पेर्धेचे आयोजन केले आहे .
या स्पर्धेत जास्तीत जास्त ई-वेस्ट गोळा करणाऱ्या व्यापारी संघटनांना प्रथम रु. ११,०००/- द्वितीय रु. ८०००/- व तृतीय रु. ५०००/- चे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल कडून ई -सर्टिफिकेट दिले जाणार आहे .
ई -वेस्ट मध्ये मोबाईल फोन ,लॅपटॉप ,रेफ्रिजरेटर ,केबल ,
वॉशिंगमशीन ,स्पीकर ,टीव्ही ,
डिशवॉशर ,मायक्रोफोन ,माइक्रोवेअर ,टेपरेकॉर्डर ,हेडफोन ,प्रिंटर्स ,चारजर्स ,म्युसिक सिस्टिम ,पेनड्राईव्ह ,डिजिटल कॅमेरा ,एअर -कंडिशनर्स इत्यादी वस्तू स्वीकारल्या जाणार आहे .
*शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी हा उपक्रम पुण्याच्या विविध भागात राबवण्यात येणार आहे *
ई -वेस्ट हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्यामुळे याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असल्यानें नागरिकांमध्ये याची जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम पुणे व्यापारी संघटनांकडून राबवण्यात येत आहे .
यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त ई -वेस्ट गोळा करावा असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे .
ह्या प्रसंगी अरविंद कोठारी ,लायन्स क्लब चे व्दितीय प्रांतपाल ला. सुनिल चेकर, मिलिंद शालगर,यशस्वी पटेल ,राहुल हजारे ,बॉबी मैनी ,प्रमोद शहा, अमृत सोळंकी ,मनोज शाह ,सुरेखा सांडभोर ,प्रल्हाद लड्ढा ,कुमार भोगशेट्टी ,सुरेश पोळेकर,मनीष पारेख ,मिठालाल जैन ,प्रमोद चव्हाण,निलेश तेजवानी ,कमलेश शहा ई.विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते .

Leave a Reply