Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

फास्ट्रॅकने व्हॅलेन्टाईन्स डेसाठी सादर केले घड्याळांचे मिक्समॅच्ड कलेक्शन

दोन विरुद्ध स्वभावांच्या व्यक्ती एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात. फास्ट्रॅकने व्हॅलेन्टाईन्स डेसाठी सादर केलेले कपल वॉचेसचे कलेक्शन याच थीमवर आधारित आहे. कूल ऍक्सेसरीजची अनोखी श्रेणी देणारा, युवा पिढीचा आवडता ब्रँड म्हणून नावाजल्या जाणाऱ्या फास्ट्रॅकने आणलेले ‘मिक्समॅच्ड’ हे पहिले पेयर वॉच कलेक्शन आहे.

फास्ट्रॅक मिक्समॅच्डमध्ये वेगवेगळ्या स्वभावांना साजेशा, अनोख्या व मजेदार वैशिष्ट्यांची आकर्षक सरमिसळ आहे.  एकमेकांसोबत असताना देखील स्वतःची खास लय जपणाऱ्या व्यक्तींमधील प्रेमाच्या नात्याचा आनंद या कलेक्शनमध्ये साजरा केला जात आहे.

या पेयर वॉचेसमध्ये सेकंद काट्यावर हार्ट व हार्टबीट एलिमेंट्स आहेत जे तुम्हाला दर क्षणाला तुमच्या साथीदारासोबतच्या नात्याची आठवण करून देतात.

मिक्समॅच्ड कलेक्शनमधील सर्व घड्याळांमध्ये व्हॅलेन्टाईन्स डेची थीम अतिशय सुबक व नाजूकपणे दर्शवण्यात आली आहे. आणखी एक आकर्षण म्हणजे ही घड्याळे कलेक्टिबल बॉक्सेसमध्ये मिळतात.

फुले व चॉकलेट्सचा तोचतोचपणा सोडा आणि एकमेकांपेक्षा वेगळ्या तरीही, एकमेकांना अनुरूप पेयर वॉचेसमधून आपले प्रेम उस्फुर्तपणे व्यक्त करा.

चमकदार सोनेरी, तजेलदार राखाडी, लोभस गुलाबी आणि मोहक निळा या आधुनिक रंगांमध्ये फक्त ३९९५ रुपयांच्या सहज परवडण्याजोग्या किमतीला उपलब्ध आहेत. सर्व फास्ट्रॅक स्टोर्समध्ये, टायटन वर्ल्डमध्ये, fastrack.in वर तसेच लार्ज फॉरमॅट स्टोर्स, अधिकृत डीलर्स आणि सर्व मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील ही घड्याळे खरेदी करता येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading