Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

बी.एस.एन.एल. कर्मचाऱ्यांची निदर्शने

पुणे – सातार रोड पुणे या ठिकाणी दुपारी जेवाणाच्या सुट्टीत दोन वाजता बी.एस.एन.एल.नॉन एक्झिक्युटिव्ह जॉईंट फोरमच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं आयोजित करण्यात आले.या निदर्शनामध्ये २०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रामुख्याने  बी.एस.एन.एल. एम्प्लॉईज युनियन आणि  एन. एफ. टी. ई च्या कर्मचाऱ्यानी. सहभाग घेतला. या निदर्शनासाठी   पुढीलप्रमाणे प्रामुख्याने मागण्या करण्यात आल्या .१) खाजगी कंपन्या २०१२ पासून  4G सेवा देत आहेत.बी.एस.एन.एल. सरकारी कंपनी असून देखील  4G सेवा देऊ शकत नाही.बी.एस.एन.एल. ला जिवंत ठेवण्यासाठी फोर– जी ची अत्यंत गरज आहे म्हणून बी.एस.एन.एल.ला  त्वरित 4G/5G देण्यात यावी.२)आज सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा आयोग  मिळालेले असताना मात्र बी.एस.एन. एल . ला मात्र पेरीव्हीजन पासून वंचित ठेवण्यात आले आहे २०१७ पासून महागाई दुप्पट झाली असून हे पेरीव्हीजन होणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी आहे तिसरे पेरीव्हीजन १५ टक्के फिटमेंत सहित लवकरात लवकर लागू करा.३)  पे स्केल मधील त्रुटी दूर करा, इत्यादी मागण्या करण्यात आल्या. यावेळी कॉम्रेड युसुफ जकाती, विकास कदम उल्हास जावळेकर , आनंद मुडविकर, बबन सूर्यवंशी, संदीप गुळंजकर,रोहीणी कुलकर्णी  यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या समयी पुष्पा फराटे, शामा गांधी, गीता चेलीवरी , मंजुषा लचके, संगिता नागपुरे, शशांक नायर, किशोर गवळी, नितीन कदम, अविनाश कांबळे, खलिल सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading