Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

स्वयंसेवी संस्थांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 

पुणे : सेवावर्धिनी या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे तथा त्यांच्या कार्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या प्रदर्शनात राज्यातील ५० स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनास प्रवेश विनामूल्य आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या संस्थांमध्ये पुर्णम इको व्हिजन, सोलापूर येथील उद्योगवर्धिनी, सांगोला येथील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, प्रिसिजन फाउंडेशन, मेळघाट येथील संपूर्ण बांबू केंद्र आणि नीड आदी संस्थांचा समावेश आहे.  बांबू उत्पादने, बचतगट आणि महिलांनी बनिवलेले उन्हाळी पदार्थ, कापडी उत्पादने, गो आधारित उत्पादने, कलाकुसरीचे साहित्य, सौर दिवे, पुस्तके अशा विविध वस्तू आणि संस्थांच्या कार्याची माहिती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे कार्य लोकांसमोर यावे, आणि स्थानिक कलाकारांना, उद्योजकांना याद्वारे प्रोत्साहन मिळावे, हे या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

Leave a Reply