Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

शनिवारवाडा येथे मतदार जनजागृती

पुणे – कसबा पेठ विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याअंतर्गत शनिवारवाडा येथे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

याठिकाणी मतदानाचे महत्व सांगणारा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. स्वीप समन्वयक अधिकारी आशिष महाडदळकर, रेवती शाळीग्राम, समीर वाळिंबे, गणेश सपार, कल्पेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने नागरीकांना २६ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी होणाऱ्या मतदानाबाबत माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

सेल्फी पॉईंट हा तिथे येणाऱ्या नागरिकांसाठीआकर्षण ठरला. नवयुवक, मुले आणि जेष्ठ नागरिकांनी तेथे आवर्जून सेल्फी घेतली. यावेळी सर्वांना मतदार नोंदणी संकेतस्थळाची माहितीदेखील देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading